मुंबई । दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता आलेख समोर आल्याने परिस्थिती चिंताजनक बनत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या आकडेवारीमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यच नाही तर बॉलिवूड मध्येही कोरोनाचा कहर वाढलेला आहे.
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, मनोज वाजपायी, कार्तिक आर्यन, यांच्या पाठोपाठ आता भूमी पेडणेकर या अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
भूमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. आजच मला मी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समजले असून
मी घरीच स्वतः ला कॉरनटाईन केले आहे असे भूमीने सांगितले आहे.
भूमीला कोरोनाची लागण झाल्याचे समजता तिने आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस कोविड चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. मी योग्य ती खबरदारी घेत असून सुद्धा मला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा व सहकार्य करा. स्वतः ची व घरच्यांची काळजी घ्या या अर्थाची पोस्ट भूमी ने इन्स्टाग्रामवर वर शेयर केली आहे.
दरम्यान, बॉलिवूड मध्ये कोरोनाचा विळखा अजूनच घट्ट होताना दिसत आहे.आगामी चित्रपट राम सेतूच्या चित्रीकरणादरम्यान तब्बल ४५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे ऐनवेळी चित्रीकरण थांबवावे लागले.