राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणीत अधिक भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढून देखील केंद्राकडून राज्याला मोठया प्रमाणात लस उपलब्ध होत नाही, ही चिंतेची बाब आहे. सध्या दुसऱ्या लाटेच फटका बसत असल्याचे चित्र दिसतं आहे. तेव्हा महाराष्ट्रात लसीचा जास्तीत जास्त पुरवठा केला पाहिजे.
त्याच प्रमाणे रुग्णाच्या संख्येप्रमाणे लस मिळावी यासाठी पाठपुरावा चालू आहे. लसीचा पुरवठा हा मोठा प्रश्न असून चिंता असल्याचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच नाईलाज झाला तर लॉकडाउन करावं लागेल असही त्यांनी बोलून दाखविले आहे.
रुग्णांच्या संख्येप्रमाणे राज्याला लस पुरवली पाहिजे अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारला केली. तसेच लसीची उपलब्धता आणखी वाढावी म्हणून भारत बायोटिक ची लस राज्य सरकारच्या मालकीच्या इन्स्टिट्यूट मध्ये तयार करण्याची परवानगी केंद्राने राज्य सरकारला द्यावी अशी विनंती त्यांनी केली. त्याप्रमाणे हॉकिंस कंपनीला भारत बायोटिकच्या कोरोना लसीचा टेक्नॉलॉजी आणि परवानगी द्यावे अस पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल आहे.