सोलापूर-सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालय मधील कोविड सेंटरमध्ये एका ३७ वर्षीय इसमाने आत्महत्या केली आहे. बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावचे रहिवासी असणारे उमेश कोंढरे यांच्यावर बार्शीतील कोविड सेंटरमध्ये उपचार चालू होते. यामध्ये त्यांची आई,पत्नी आणि दोन मुले हे देखील कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर ही उपचार सुरु होते.
दरम्यान आज पहाटे ५वाजता उमेश कोंढारे यांनी कोविड सेंटर मधील स्वच्छता गृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत.मात्र कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.