दिल्ली- देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार पसरला अजून कोरोनाची लागण झालेली रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येत कमालीची वाढ होत असून दिवसेंदिवस रुग्ण प्रकृती स्थिर होणारी टक्केवारी खालावत जात असल्याने परिस्थिती चिंताजनक होत आहे.अशातच आता राजधानी दिल्लीत कोरोनाचे तांडव सुरू आहे.
दिल्लीतील सर गंगाराम खाजगी रुग्णालयातील डॉक्टर कोरोनाबाधितांवर उपचार करत असताना या रुग्णालयातील तब्बल ३७ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.या डॉक्टरांवर उपचार सुरू असून त्यांना विलगिकरण विभागात ठेवण्यात आले आहे.तर काही डॉक्टरांमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.