स्त्रीयांची दोन रुपे समाजात सतत वावरत असतात. एक शौर्यमय दुर्गेचे आणि दुसरे सोशीक मातेचे.
ह्याच समाज स्त्रीचे पांग फेडण्याचा एक तिच्या हक्काचा दिवस म्हणजेच महिला दिन. ह्याच महिला दिना निमित्ताने शौर्य फाउंडेशन ह्या समाजसेवी संस्थेमार्फत टिटवाळानजीक वसलेल्या कोनावाडी या आदिवासी भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स तसेच डेटॉल साबण व मास्कचे मोफत वितरण करण्यात आले.
ज्यांच्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था टिकून राहते त्या ठाणे शहर पोलीस उप-आयुक्तालय, वाहतूक शाखा पोलीस भगिनींकरिता शौर्य फाऊंडेशनच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन्सचे बॉक्स भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडे यांची देखील उपस्थिती लाभली. तसेच उपस्थित सर्वांनीच शौर्य फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमात प्रामुख्याने फाऊंडेशनचे सोहम चव्हाण, जयेश ढोकणे, सागर चव्हाण, सिद्धी चासकर, दुर्गेश माशेरे, कोमल राऊत, मंदार कांबळे, ज्योती चोरगे, स्नेहल सुतार यांचा सहभाग राहिला.