संपूर्ण राज्यभरात झपाट्याने कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर पडताना दिसत आहे. यावेळी कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये म्हणून राज्य सरकारकडून विविध उपायोजना राबवल्या जात आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात १५ दिवसाचा लॉकडाऊन देखील लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत नाशिक मनपाने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची संख्या कमी करण्याबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक मनपाने असा निर्णय घेतला आहे की, नाशिकच्या कोव्हिड रुगणालयांमध्ये रुग्णांना भेटायला येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. अनेक कोव्हिड सेंटर असणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी असते. यामुळे संसर्गाचा धोका अधिक प्रमाणात वाढलेला आढळून आला आहे. हे लक्षात घेताल पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या निर्देशानुसार, सुरुवातीला १००० रुपयांचा दंड आकारला जाणार, दंड आकारल्यानंतरही नातेवाईकांनी रुग्णांना भेट देणे सुरूच ठेवले तर थेट गुन्हा दाखल केले जाणार आहेत. शहरात झाकीर हुसेन, बिटको रुग्णालय याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्याठिकाणी रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांकडून गर्दी केली जाते त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे.