छत्तीसगडमध्ये शनिवारी नक्षलवादी विरोधी कारवाई करण्यात आली होती. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार विजापूर- सुकुमा परिसरात नक्षलवादी तळ ठोकून बसल्याची खबर सीआरपीएफच्या जवानांना मिळताच मोठी कारवाई करण्यात आली. नक्षलवादी आणि सीआरपीएफ चे जवान यांच्यात सुमारे तीन तास चकमक चालू होती. या चकमकीत ९ नक्षलवादी ठार झाले असून नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देताना सीआरपीएफचे २२जवान शहीद झाले आहेत.
On ground visuals from the site of Naxal attack at Sukma-Bijapur border in Chhattisgarh; 22 security personnel have lost their lives in the attack pic.twitter.com/sVCoyXIRwN
— ANI (@ANI) April 4, 2021
विजापूर- सुकुमा परिसरातील डोंगराळ भागात ७०० नक्षलवाद्यांनी चारही बाजूने जवानांना घेतलं होतं.या चकमकीत १४ जवान बेपत्ता तर २२ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. बेपत्ता झालेल्या १४ जवानांच्या शोध मोहिमेनंतर अखेर त्यांचे मृतदेह छत्तीसगडच्या जंगलात आढळले असून एक जवान अजूनही बेपत्ता असून शोधमोहिम सुरू आहे.
दरम्यान या चकमकीत काही नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीआरपीएफच्या बस्तारीया बटालियन आणि कोब्रा कमांडो या दोन्ही फोर्स ना यश मिळाले आहे.
छत्तीसगड मधील विजापूर-सुकुमा भागातील जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे प्रमुख ठिकाण मानले जाते.या चकमकीत नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला सुरुवातीला सीआरपीएफ च्या जवानांनी जीवाची बाजी लावत चोख प्रत्युत्तर दिले. परंतु जंगलात वास्तव्य करत असलेल्या सुमारे ४०० नक्षवाद्यांनी जवानांचे शस्त्र व अन्य वस्तू जप्त केल्या.गंभीर बाब म्हणजे या दहा दिवसातील हा दुसरा नक्षलवादी हल्ला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या दुर्दैवी घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करून परिस्थिती चा आढावा घेण्यास सांगितले असून या हल्ल्याचा बदला लवकरच घेण्यात येईल असा नक्षलवाद्यांना इशारा देण्यात आला आहे.