कोल्हापूर- कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी राज्यात १५ एप्रिल म्हणजे आजपासून संचारबंदी करण्यात आली आहे. कोल्हापूरात ही बुधवार पासून लागू करण्यात आली. संचारबंदी १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लागू असून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतचा सविस्तरआदेश रात्री जाहीर केला.
बुधवारपासून १४४ कलम लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य नागरिक विनाकारण फिरल्यास १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद राहतील. सरकारी तसेच महत्त्वाच्या सेवा आणि आस्थापनांना सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. घरेलू कामगार, वाहन चालक यांना स्थानिक परिस्थितीनुसार व मान्यतेनुसार काम करता येईल.
जाहिर केलेल्या आदेशानुसार रुग्णालय, रोगनिदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने,औषधे निर्मिती लस, निर्जंतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे यांचे उत्पादन व वितरण,वृत्तपत्रांची छपाई व वितरण, हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्य पदार्थांच्या गाड्या येथील केवळ पार्सल सेवा. शासकीय व खासगी पशुवैद्यकीय दवाखाने, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि खाद्य दुकाने,विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बस, माल वाहतूक , बँका, वित्तीय बाजाराशी निगडीत संस्था , स्टॉक एक्स्जेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इ. शेती व संबंधित सेवा व दुकाने, व्यापारी मालाची आयात निर्यात, ई कॉमर्स,पेट्रोलपंप ,कार्गो सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी सेवा इ. सेवा चालु राहतील.
सिनेमा हॉल, नाट्यगृहे आणि प्रेक्षागृहे, मनोरंजन पार्क, आर्केडस्, व्हिडीओ गेम्स पार्लर्स, वॉटर पार्क क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि क्रीडा संकुले, चित्रपट, मालिका, जाहिराती यांचे चित्रीकरण. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने, सर्वधर्मीय धार्मिक – प्रार्थना स्थळे केशकर्तनालय,स्पा, सलून, ब्युटी पार्लर, शाळा आणि महाविद्यालये, धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्व बंद राहिल.