भोपाळ। भोपाळ मध्ये एका खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एक मोठी सर्जरी केली आहे. या डॉक्टरांनी एका मुलीच्या पोटातून १६ किलो वजनाचा ट्युमर बाहेर काढला आहे. डॉक्टरांनी रविवारी ६ तास चालल्या सर्जरीनंतर २० वर्षीय मुलीच्या पोठातून १६ किलोचा ट्युमर बाहेर काढला.
मुलीच्या गर्भाशयाच्या जवळ ट्युमर असल्याचे हॉस्पिटलच्या मॅनेजर देवेंद्र चंदोलियांनी सांगितले. तिचा ट्युमर खूप मोठा होता. त्यामुळे जेवन करण्याबरोबरच तिला चालताना ही त्रास होत होता. या ट्युमरला डिम्बग्रंथि ट्युमर म्हणून ओळखले जाते.
या मुलीचे वजन ४८ किलो आणि तिचा ट्युमर १६ किलोचा होता. जर वेळेत ट्युमर काढला नसता तर धोका वाढला असता.