नियामी। आफ्रिका खंडातील नायजर या देशामध्ये दहशतवाद्यांनी भीषण गोळीबार केल्यामुळे गावांचं रुपांतर हे एका पडीक स्मशानात झालं आहे. बाईकवरून आलेल्या काही दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १३७ जण ठार झालेत. त्याचबरोबर दहशतवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली. यामध्ये अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. तर काही ठिकाणी रक्ताचे पाट वाहिले आहेत. बाईकवरून मोठ्य़ा संख्येने दहशतवादी आले. त्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, नायजरच्या पश्चिम भागातील टाहौआतील इंटाजेने, बॅकोरेट आणि अन्य ठिकाणच्या गावांमध्ये रक्ताचे पाट वाहिले. हा भाग माली देशाच्या सीमेजवळ आहे. सध्या दहशतवादी हल्ल्याची कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जवळपास १३७ जण ठार झाले आहेत. पश्चिम नायजर भागात मागील काही वर्षांपासून दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. सामान्य नागरिकांसोबतच सुरक्षा दलाच्या जवानांवर देखील हल्ले करण्यात येत आहे.