मुंबई – सध्या आयपीएल मॅच चालू आहेत. मात्र चालू मॅचमध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतात. मैदानावर जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. गुरुवारी विरुद्ध राजस्थान रॉयल सामन्या दरम्यान मुंबईचा जोरदार चर्चा असणारा सुर्यकुमार यादवने त्याच्या बायकोला किस केलं. त्यामुळे एकीकडे स्टेडियममध्ये प्रेमाची झप्पी तसेच सोबत पप्पी देखील बघायला मिळाली. त्यांचा याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.मुंबई इंडियन्स
क्रिकेटपटू झहीर खानची पत्नी व मराठी अभिनेत्री सागरिका घाटगे हिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सूर्यकुमार यादव त्यांची पत्नी देविशा शेट्टीला किस करताना दिसून येत आहेत. या फोटोमध्ये किस करताना दोघांमध्ये काचेची ग्लास आलेली आहे. या फोटोला चाहत्यांनी पसंती दिली आहे.
दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावार मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईने राजस्थानवर ७ विकेट्सने विजय मिळवला