आपण आतापर्यंत जगातील उंच, लहान, मोठया अशा अनेक गोष्टी ऐकल्या अभ्यासल्या मात्र आता देशातील सर्वात उंच सायकल कोणती याचं उत्तर आता मिळालं आहे. या सायकलचा शोध चंदीगडमध्ये लागला आहे. चंदीगडमध्ये राजीव कुमार यांच्या सायकलीची उंची तब्बल ८ फूट ३ इंच इतकी आहे. देशातील सर्वात उंच फोल्डेबल सायकल म्हणून त्याच्या सायकलीची लिम्का बुकमध्येदेखील नोंद झाली आहे.
सायकलचा व राजीव यांचा एक खास किस्सा आहे. राजीव जेव्हा दहावीत होते तेव्हा वर्गात त्यांची उंची सर्वाधिक होती. त्यांनी आधी आपल्या सायकलची सीट थोडी उंच केली. त्यामुळे सायकल चालवताना त्यांना मजा येऊ लागली. त्यानंतर त्यांची उंची जसजशी वाढत गेली तसतशी त्याच्या सायकलची उंचीही वाढली. २०१३ मध्ये त्यांनी स्व:ता ही सायकल बनवली आहे. ही सायकल चालवण्याची विशिष्ट पद्धत असून कुणालाही ती जमत नाही. भविष्यात चंदिगडहून मुंबईला जाण्याची त्यांची योजना आहे. ज्यावेळी राजीव ही सायकल घेऊन रस्त्यावरून जात असतात तेव्हा सर्व लोक त्यांना बघत असतात.