व्हिएतनाममध्ये १२ व्या मजल्यावरील बाल्कनीतून अवघ्या दोन वर्षांची मुलगी खाली पडली, पण नशीब बलवत्तर म्हणून रस्त्यावर असलेल्या एका डिलिव्हरी ड्रायव्हरने तिला अलगद झेललं आणि तिचा जीव वाचला. रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होत आहे.
या मुलीला अलगद झेलणाऱ्या डिलिव्हरी ड्रायव्हर चे नेटकाऱ्यांकडून कौतुक होत असून स्थानिक माध्यमांद्वारे त्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे.. या धाडसी तरुणाचे नाव न्ग्येन नागॉस मैनह असून 31 वर्षीय न्ग्येनने Anninhthudo या स्थानिक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीनुसार , तो एका ग्राहकाला ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी हनोईला गेला होता.
????¡HEROICA ATRAPADA!????
Un repartidor le salvó la vida a una niña de 3 años que cayó del piso 12 de un edificio en Vietnam.
La nena sufrió fracturas en la pierna y en los brazos, pero está viva gracias a la heroica acción de Nguyen Ngoc Manh❤️, quien sufrió un esguince.#VIRAL pic.twitter.com/eI03quT0IM
— Unicanal (@Unicanal) March 1, 2021
रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कारमध्ये बसून ग्राहकाची वाट पाहत असतानाच समोरच्या इमारतीतून एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला. खिडकीतून डोकं बाहेर काढून वरती बघितल्यावर एक चिमुकली १२ व्या मजल्यावरील बाल्कनीत लटकली असल्याचं चित्तथरारक घटना पाहून तो कारमधून बाहेर निघाला आणि प्रसंगावधान राखत तो धावत इमारतीखाली गेला व खाली पडणाऱ्या चिमुकलीला अलगद झेललं.
या सगळ्या प्रकरणानंतर सद्या या लहान मुलीला रुग्णालयात दाखल केलं अजून तीची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जाते.