प्रतिनिधी- दुर्वा मुरुडकर
भांडूप परिसरातील सनराईझ रुग्णालयामध्ये आग लागल्याची घटना घडली. ड्रीम्स मॉलमध्ये हे रुग्णालय आहे. मॉलच्या पहिल्या मजल्याला आग लागली आणि त्याचा धूर सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या सनराईज रुग्णालयापर्यंत पोहोचला. सदर घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुंबई अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. मी पहिल्यांदाच एखाद्या मॉलमध्ये रुग्णालय असल्याचं पाहत आहे, या प्रकरणी नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल. या रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहितीही महापौर यांनी दिली आहे.
पोलीस उपायुक्त प्रशांत कदम म्हणाले की, रात्री १२.३० च्या सुमारात ड्रीम्स मॉलमधील पहिल्या मजल्यावर आग लागली, लेव्हल ३-४ ची ही आग असल्यानं २३ अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहचले. तसेच आतापर्यंत ७६ रुग्णांना कोविड सेंटरला हलवण्याल आलं आहे.भांडूप येथे सनशाईन रुग्णालयाला भीषण आग लागण्याची घटना घडली त्याप्रसंगी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. प्राथमिक तपासात हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करत, दोषीवर कारवाई करण्यात येईल.असे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले आहे.