मुंबई : मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता बृहमुंबई महानगर पालिकेने रुग्णवाढ रोखण्यासाठी कंबर कसली आहे. त्यात येणाऱ्या दिवसात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येला रोखण्यासाठी वरळीतील नेहरु विज्ञान केंद्रात कोव्हिड आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याची माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे.
नेहरु सायन्स सेंटरमध्ये १५० रुग्णशय्या क्षमतेच्या समर्पित कोरोना आरोग्य केंद्रासह पोद्दार आयुर्वेदिक महाविज्ञालयात २२५ बेड्सची क्षमता असलेले कोव्हिड काळजी केंद्र आहे. पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. वरळीतील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (NSCI) येथील विद्यमान समर्पित कोरोना आरोग्य केंद्रातील रुग्णशय्यांची क्षमता देखील ५०० वरुन वाढवून आता ८०० इतकी करण्यात आली आहे.
आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते व व्ही सीच्या माध्यमातून माझ्या उपस्थितीत वरळी येथील पोद्दार रूग्णालयात १९३ खाटांचे सीसी-१ व सीसी-२ कोविड समर्पित विभागाचे तसेच नेहरु सायन्स सेंटर येथील १५० बेड्सच्या रुग्णालयाचे लोकार्पण केले’ असे ट्विट पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
आज मुंबईच्या महापौर @KishoriPednekar जी यांच्या हस्ते व व्ही सीच्या माध्यमातून माझ्या उपस्थितीत वरळी येथील पोद्दार रूग्णालयात १९३ खाटांचे सीसी-१ व सीसी-२ कोविड समर्पित विभागाचे तसेच नेहरु सायन्स सेंटर येथील १५० बेड्सच्या रुग्णालयाचे लोकार्पण केले. pic.twitter.com/0bXsJh5O4G
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 12, 2021