पुणे दि.६- राज्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्णाची संख्या कमी न होता वाढतच आहे. त्यात पुण्यातही आता प्रत्येक दिवसाला नवीन रुग्ण वाढत जात आहेत. यातच पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु असल्याने अधिक रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला असून पुण्यात परत निर्बध लागू होणार कि नाही याचा शुक्रवारी घेण्यात निर्णय घेणार आहे. येत्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे. या बैठकीत पुण्यातील निर्बंधाबवर निर्णय घेण्यात येणार आहे.
आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूट या संस्थांनी पुण्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे. शाळा आणि महाविद्यालयं सुरू झाल्यामुळे येथे कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं या संस्थांनी म्हटलंय. तसे निष्कर्ष आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूटने काढले आहेत.
दरम्यान पुण्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येथील प्रशासनाची धावपळ उडत आहे. शाळा आणि महाविद्यालये सुरु केल्यामुळे कोरोना रुग्ण वाढल्याचे समोर आल्यानंतर आता शाळांना पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.