मुंबई – संपूर्ण राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन विरोध करणाऱ्या भाजपवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे. लॉकडाऊन केले तर आम्ही रस्त्यावर उतरू, तांडव करू, असा इशारा भाजपचेनेते देत आहेत. मात्र, विरोधी पक्षाच्या या तांडवामुळे दुष्परिणाम हे जनतेलाच भोगावे लागतील अशा शब्दात भाजपवर निशाणा साधला आहे.
काय नेमकं होत आजच्या ‘सामना’च्या मुखपत्रात ?
लॉकडाऊन केले तर आम्ही रस्त्यावर उतरू, तांडव करू, असा इशारा भाजपचे नेते देत आहेत. मात्र, विरोधी पक्षाच्या या तांडवामुळे दुष्परिणाम हे जनतेलाच भोगावे लागतील, असं म्हणत शिवसेनेनं भाजप नेत्यांना फटकारलं आहे.आम्हाला काय कोणाची भीती? कोरोना आम्हाला स्पर्श करणार नाही, या फाजील आत्मविश्वासाच्या मानसिकतेमधून कोरोना वाढत गेला. कोरोनासंदर्भात सबुरीचे सल्ले देणारे या बेफिकिरी मंडळींना दुश्मन वाटू लागतात. देशातील दहा जिल्हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत, असं अग्रलेखात म्हटलंय.
हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचविण्यासाठी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. कोरोना कुणालाही सोडत नाही, असा भावनिक सल्ला शिवसेनेने आजच्या सामनातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.