दर वर्षी आयपीएलचे सामने हटके खेळीने पार पडत असतात. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने याचा परिणाम आयपीएलवर देखील जाणवला मात्र प्रत्येक संघातील खेळाडू आपली संपूर्ण ताकद खेळण्यात घालवत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने हैदराबादवर ७ विकेट्सने सहज विजय मिळविला. हैदराबादने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य चेन्नईने १८.३ षटकांतच गाठले. यात ऋतुराज गायकवाडच्या ७५ धावा आणि फाफ डू प्लेसिसच्या ५६ धावा निर्णायक ठरल्या.
या खेळीसह प्लेसिसने अर्धशतकासह एक विशेष कामगिरीदेखील केली. त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दिल्लीच्या शिखर धवनला मागे टाकत अव्वल स्थान गाठले. त्यामुळे आता ऑरेंज कॅपची शर्यत अजूनच चुरशीची झाली आहे. आता सर्वाधिक धावा या प्लेसिसच्या आहेत. मात्र अजून खूप सामने बाकी असल्याने या कॅपचा मानकरी कोण ठरणार हे आयपीएलच्या शेवटी समजेल.
सध्या शिखर धवन दुसऱ्या स्थानी घसरला असून त्याच्या ६ सामन्यांत २६५ धावा आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल असून त्याच्या ६ सामन्यांत २४० धावा आहेत