डीचोली गोकुळवाडी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी जन्मलेले बाळाला पिशवीत भरून टाकून दिल्याचा प्रकार समोर आला.
कचरा समजून एकाने पिशवी उचलून टाकण्याचा प्रयत्न केला तर त्या पिशवीतून रडण्याचा आवाज आला त्यामुळे पिशवी उघडताच बाळ असल्याचे समजले. मुलगी असलेले संबंधित बाळ सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आहे .
ही घटना पोलिसांना समजल्यावर ते घटनास्थळी आले. त्यांनी बंद केलेल्या प्लास्टिक पिशवीतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. पोलिसांनी कात्रीने प्लास्टिक पिशवी हळूवारपणे फाडली.बाळाला अलगद उचलून गाडीतून तातडीने रुग्णालय गाठले. मुलगी असल्यामुळे संबंधित बाळ टाकले असावे किंवा ‘सिंगल मदर’चाही प्रकार असावा, अशी शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली. पोलिस नानाविध शक्यतांच्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत.