मुंबई दि. १५ – राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 68 वर्षीय अहमद शाह नावाच्या वयोवृद्धाने मादी कुत्र्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी व्यक्तीला अटक केली आहे. डीएन नगरच्या पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली आहे. त्याने अनेक पाळीव तसंच भटक्या कुत्र्यांवर बलात्कार केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. ही घटना 2020 सालच्या डिसेंबरमध्ये घडली होती. ज्याचा नुकताच खुलासा करण्यात आला आहे. याप्रकरणी बॉम्बे अॅनिमल राईट्स या संस्थेच्या विजय मोहन मोहनानी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे.
विजय मोहन यांच्या तक्रारीनंतर आणि एका व्हिडीओच्या आधारे डीएन शहर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून संबंधित वृद्धाला अटक केली आहे. हे प्रकरण चर्चेत येताच सोशल मीडिया याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेकांनी आरोपी वृद्धाच्या कृत्याचा निषेध केला आहे.