साध्य पुन्हा एकदा बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारण चांगले तापलेले दिसून येत आहे. त्यात आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार सरकार संपूर्ण बरखास्त करण्याची मागणी केली आहे. बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात विधानसभा परिसरात विरोधी पक्षाच्या आमदारांना झालेल्या मारहाणीचा विषय पुन्हा तापत चालला आहे. त्यात ही मागणी केलेली आहे.
सिन्हा म्हणाले की, आमदारांच्या प्रतिष्ठेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही आणि सभागृहाची अस्मिता सर्वांत मोठी आहे. आमदारांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना ओळखून त्यांच्यावर कारवाईचे निर्देश आयुक्त तथा पोलीस महानिरीक्षकांना सिन्हा यांनी दिले. याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना लिहिलेल्या पत्रात विधानसभा परिसरात आमदारांना बुटांनी मारहाण करणारे दोषी पोलीस अधिकारी आणि जवानांंवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
तेजस्वी यादव यांनी पत्रात लिहिले की, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर ज्या प्रकारे सभागृहात विरोधी सदस्यांना क्रूरपणे मारहाण करून ‘बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयक २०२१’ ज्या प्रकारे संमत केले गेले ते लोकशाहीला घातक आहे. राज्यपालांना पत्र लिहून त्यांनी सरकार बरखास्त करावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.