गेल्या वर्षांपासून कोरोनाने राज्यभरात थैमान घातलं आहे. तशातच आता पुन्हा राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांत पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. काही भागांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय, असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी उपस्थित केला आहे.
तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येत आहेत, म्हणून कोरोना वाढतोय का? महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये कोरोना नाही. मग महाराष्ट्रातच तो कसा वाढतोय? सरकारचं कोरोनावर प्रेम आहे की कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे? असे प्रश्न मनसेनं राज्य सरकारवर केली आहे. सरकार एवढे कडक निर्बंध लावत असेल, तर जनतेला काही सवलती देणार का? असाही प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.