पुराणानुसार अनेक गोष्टीच पालन आपण करत आल्याचे दिसून येते, त्यात अजूनही आपल्या पूर्वजांनी बनवलेल्या रुढी परंपरेनुसार अनेक चालीरीती आपण पाळत आहोत. जस की पुराणात हे सांगितल आहे, पूर्वजांनी हे करायला सांगितलं आहे, हे खाल्याने अमुक अमुक होत, इथे जाणं टाळावं, तिथे जाऊ नये अशा अनेक गोष्टी समाजात अजूनही पाळत असल्याचे दिसून येतात. असच गरुड पुराणात अशा काही ठिकाणांचा उल्लेख केला आहे जिथे कधीही काहीही खाऊ नये. जर अशा ठिकाणी जेवण केलं तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. ती नेमकी ठिकाणे कोणती? जाणून घेऊया पुढीलप्रमाणे-
गरुड पुराणात असे म्हटलं आहे की, आपण ज्या प्रकारचे अन्न खाल त्या प्रकारचे तुमचे मन असेल. म्हणजेच, माणसाने ज्या प्रकारचे अन्न खाल्ले, त्याचे मन त्यासारखे बनते. ज्याद्वारे तो पापाचा भागीदार देखील बनतो.
गुन्हेगार व्यक्ती
गरुड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीला कोर्टात दोषी ठरवले गेले असेल तर त्या व्यक्तीच्या घरात कधीही खाऊ नका. असे केल्यास आपणही त्या व्यक्तीच्या पापामध्ये भागीदार बनता.
व्याजखोर व्यक्ती
जर एखाद्या व्यक्तीने इतरांच्या गरजेचा फायदा घेऊन त्याच्याकडून अधिक पैसे घेतले असतील तर त्याच्या घरी काहीही खाऊ नये. गरुड पुराणानुसार अशा लोकांच्या घराचे पाणी पिण्यानेही तुम्हाला पाप लागते.
रागीट व्यक्ती
रागीट व्यक्तीच्या घरी कधीही खाऊ नका. संतापलेला माणूस आपल्या मानवी भावना विसरतो. जर तुम्ही अशा व्यक्तीच्या घरी जेवण केले तर त्याचा तुमच्या शरीरावरही त्याचा परिणाम होईल.
आजारी व्यक्ती
जर एखाद्या व्यक्तीला बराच काळ कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर त्याच्या घरी अन्न खाऊ नये. ह्यामुळे आपल्या शरीरात धोकादायक जिवाणूंचा प्रवेश होऊ शकतो ज्यामुळे आपण आजारी देखील पडू शकता.
मादक पदार्थ विक्रेता
गरुड पुराणानुसार, मादक पदार्थ विकणाऱ्या व्यक्तीकडे कधीही भोजन खाऊ नये. कारण ती व्यक्ती शेकडो घरे उध्वस्त करते. अशा परिस्थितीत, त्याच्या घरी खाल्लेले अन्न देखील आपल्याला पापाचे भागीदार बनवते. म्हणूनच, अशा लोकांपासून नेहमीच दूर रहावे.