नवी दिल्ली– कोरोनाच्या वाढत जाणाऱ्या प्रदुर्भावामुळे देशभरात दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत आहे.यात भरीला भर म्हणजे औषधांचा होणारा काळा बाजार आणि कोविड लसीचा निर्माण झालेला तुटवडा याने परिस्थिती अजूनच नियंत्रणाबाहेर जात आहे.
याच पार्श्वभूमीवर लसीच्या होणाऱ्या तुटवड्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.ट्विटर वर एक व्हिडिओ पोस्ट करत राहूल गांधी म्हणाले, मागच्या वर्षी जेव्हा कोरोनाचे विषाणू देशभरात वाढत होते तेव्हा तुम्ही लोकांचे मनोबल वाढवण्या करिता थाळ्या-टाळ्या वाजविण्यास सांगितले, तसेच मोबाईल चा टॉर्च लावून किंवा पणत्या प्रज्वलित करण्यास सांगितले.परंतु थाळ्या आणि टाळ्या वाजवून कोरोना जाणार नाही.
385 दिन में भी कोरोना से लड़ाई नहीं जीत पाए- उत्सव, ताली-थाली बहुत हो चुके अब देश को वैक्सीन दो! #SpeakUpForVaccinesForAll pic.twitter.com/YkIb3yDTGO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 12, 2021
परदेशात होणारी लसीची निर्यात थांबवून आपल्या देशात लसीचा मुबलक पुरवठा करण्याची गरज आहे.
आज प्रत्येक भारतीयाला लस मिळणे हा त्याचा अधिकार आहे.लसीचा उत्सव साजरा करण्यासाठी आधी लसीचा मुबलक पुरवठा करा. कोरोनाची दुसरी लाट आल्याने अनेक जण कोरोना बाधित झाले.परिस्थिती इतकी गंभीर आहे की,लोकांच्या उपचारासाठी आरोग्य यंत्रणा अपुरी पडतेय. व्हेंटीलेटर व ऑक्सिजन न मिळाल्याने मृतांच्या वाढत जाणाऱ्या संख्येस प्रशासन जवाबदार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे अनेक मजूर कामगारांवर उपासमारीची वेळ आली.अनेक राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. थाळ्या टाळ्या वाजूनवून उत्सव साजरा करण्यापेक्षा वेळीच लसीचा पुरवठा करून देशातील परिस्थिती नियंत्रणात यायला मदत होईल.