मुंबई : परमबीर सिंह यांच्या १०० कोटी रुपयांच्या हप्ता वसुलीवरून राजकीय वर्तुळात खळबळ माजवून दिल्यानंतर सातत्याने दिल्लीतून पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षावर टीका करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नवे ट्विट केले आहे. या ट्विटमुळं पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आले आहे.
या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी आपल्या ट्रेडमार्क स्टाईलचा वापर केला आहे. त्यांनी एक शेअर ट्विट केला आहे. ‘आसमान मे उडने की मनाही नही है…. बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे’ असा मजकूर ट्विटमध्ये वापरला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणासाठी आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बुरा न मानो..
होली है……… pic.twitter.com/4pqmYKGJoC— Sanjay Raut (@rautsanjay61) March 28, 2021
सध्या फोन टॅपिंग आणि परमबीर सिंह यांच्या पत्रावरून संजय राऊत भारतीय जनता पक्षांच्या आरोपांना तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत. तर दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदावरून संजय राऊत महाविकासआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसशीही दोन हात करत आहेत. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी ‘बुरा न मानो.. होली है………’ अशी कॅप्शनही लिहली आहे. मात्र नेमका त्यांनी कोणाला सल्ला दिला ह्या संदर्भात राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होत आहे.