आयपीएल२०२१- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अजूनही या महामारीचा धोका पूर्णपणे टळलेला नाही.भारतात दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या व बाधितांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. याचपार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलिया देशात लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांनुसार परदेशातून विशेषतः भारतातून मायदेशी परतणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे आयपीएलसाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार भारत कोरोना बधितांच्या संख्येत अव्वल आहे. त्यामुळे भारतातून मायदेशी परतणाऱ्या खेळाडूंमार्फत ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका जास्त असल्याने जे खेळाडू भारतातून मायदेशी परत जाऊ इच्छुक आहेत त्यांच्यावर ऑस्ट्रेलिया सरकारद्वारे कारवाई करण्यात येईल.तसेच संबंधित व्यक्तीस अज्ञात ठिकाणी वा तुरुंगात टाकले जाईल व तीच्याकडून ६६,००० हजार डॉलर्सचा दंड आकारला जाईल.
दरम्यान भारतात आयपीएलसाठी आलेल्या डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिंस, फ्रँचायजी कोचिंग, सपोर्ट स्टाफ आणि समालोचनामध्येही रिकी पाँटिंग, डेविड हसी, ब्रेट ली, मॅथ्यू हेडन या खेळाडूंसमोर मायदेशी परतण्यासाठी मोठे आव्हान आहे.
सद्यस्थितीत ऑस्ट्रेलियातील ३६००० नागरिक हे परदेशात असून भारतात ९००० नागरिकांसमोर मायदेशी परतण्यासाठी मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.दरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांनी या निर्णयाबाबत सांगितले की
,आयपीएलसाठी भारतात गेलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू हे स्वतःच्या जवाबदारीवर गेले असून मायदेशी परतताना त्यांनी स्वतः च स्वतः ची सोय करावी.असे ते म्हणाले.