नवी दिल्ली । चित्रपट सृष्टीतील उच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची सोमवारी केंद्र सरकार कडून घोषणा करण्यात आली. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा छिछोरे या हिंदी सिनेमाला मिळाला. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कंगना रनौतला सन्मानित केले आहे. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मनोज वाजपायी यांना सन्मानित करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटांनी सुद्धा आपला ठसा निर्माण केला. या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांनी यशाचं शिखर गाठलं. ‘बार्डो’नं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार पटकावत मराठीचा झेंडा अटकेपार रोवला.
या चित्रपटासाठी दिग्दर्शक भीमराव मुंडे यांना सन्मानित केले या चित्रपटातील गाण्यासाठी सावनी रविंद्र ही सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्काराची मानकरी ठरली. तसेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या पुरस्काराने पल्लवी जोशी यांना ताश्कंद फाईल्स साठी सन्मानित करण्यात आले आहे.
तर सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपटासाठी आनंदी गोपाळ या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे विशेष पुरस्कारांमध्ये ‘पिकासो’ आणि ‘लता भगवान करे’ या चित्रपटांना यश मिळाले.
‘खिसा’ लघुपटाला बेस्ट डेब्यू नॉन फिचर फिल्म ऑफ अ डिरेक्टरसाठी तर मंदार कमलापूरकर यांना अक्षय इंडिकर दिग्दर्शित ‘त्रिज्या’ या लघुपटासाठी बेस्ट साऊंड डिझाईन पुरस्कार जाहीर झाला आहे.
तसेच अशोक राणे यांच्या सिनेमा पाहणारा माणूस ला विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हिंदी प्रमाणे मराठी सिनेमांनी मराठीचा झेंडा अटकेपार रोवला. या मराठी रसिकांकडून स्तुतीसुमने उधळली जात आहेत.
इतर पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट अभिनेता:- मनोज वाजपेयी (भोसले) आणि धनुष (असुरन)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:- कंगना रनौत (मणिकर्णिका, पंगा)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता:- विजय सेतुपती (सुपर डिलक्स)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री:- पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)
- सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षकांची पसंती):- सोहिनी चट्टोपाध्याय
- सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट:- होली राईट्स, लाडली,
- सर्वोत्कृष्ट बालकलाकार:- नागा विशाल (केडी – तमीळ)
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक:- डी. इमान (विश्वासम)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक:- सुधांशू सरिया (नॉक नॉक नॉक)
- सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट:- कस्तुरी (हिंदी)
- सर्वोत्कृष्ट गायक:- बी प्राक (तेरी मिट्टी – केसरी)
- सर्वोत्कृष्ट संवाद:- विवेक रंजन अग्निहोत्री (द ताश्कंद फाईल्स)
- सर्वोत्कृष्ट चित्रपटस्नेही राज्य:- सिक्कीम
- सर्वोत्कृष्ट पर्यावरणविषयक चित्रपट:- द स्टॉर्क सेवियर्स