सन २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी,महापुरामुळे तसेच कोरोना विषाणमुळे व अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेला आहे.शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.या समस्यांबाबत कार्यवाही व्हावी,अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी कृषीमंत्री दादाजी भुसे यांना निवेदनाद्वारे केली.यावेळी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, जिल्हा प्रमुख विजय देवणे,संजय पवार उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे,कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये ऊसाचे क्षेत्र मोठे आहे.ठिबक वापरास प्रोत्साहन देणेसाठी ठिबक ऑटोमायझेशन हा घटक अनुदानाखाली आणणे गरजेचे आहे.या घटकासाठी अनुदान देय केल्यास ऊसाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वापरात येऊ शकते. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत योजना सुरु करणे गरजेचे आहे.
काही भागात जमिन क्षारपड होऊन नापिक होण्यामध्ये मोठी वाढ होत आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अशा क्षारपड दुरुस्तीची योजना राबवून शासनाने पुढाकार घेवून विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा.राज्य सरकारने कर्ज माफी दिली त्यामध्ये कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदारांना पन्नास हजार रुपये सानुग्रहअनुदान देण्याची घोषणा केली होती.अशा नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या कर्जदारांना हे अनुदान त्वरीत मिळावे.
तसेच माहे जुन ते ऑगष्ट २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे करुन अनुदानासाठी प्रस्ताव केंद्राच्या मदत व पुर्नवसन खात्याकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यासाठी त्वरित निर्णय व्हावा.अद्यापही काही शेतकरी संयुक्त खातेदार नुकसान भरपाई व कर्जमाफीपासून वंचीत आहेत त्यांना ही