मुंबई – कांजूरमार्ग येथे मेट्रो-3 प्रकल्पाची कारशेड उभारण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे नगरविकासमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली असून मेट्रोसाठी कांजूरमार्ग ही जागा योग्य असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
2031 पर्यंत आरे कारशेडमध्ये 42 गाड्यांचा समावेश करता येईल. पुढील वाहतुकीसाठी पाच हेक्टर जागेची आवश्यकता लागेल. त्यासाठी एक हजारापेक्षा जुनी झाडे तोडावी लागतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंगळवारी विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी लेखी स्वरुपात ही माहिती सादर केली. मेट्रो कारशेडसाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेला अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे.
गेल्यावर्षी फडणवीस सरकारने एका रात्रीत आरेतील जंगल तोडून कारशेड करण्याला प्रकरणाला पर्यावरणवाद्यांचा विरोध होता ते प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले होते. तेव्हा शिवसेनेने आपण सत्तेत आल्यास मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देऊ, असे आश्वासन दिले होते. आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती.