छत्रपती संभाजीनगर :विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी क्रांती चौक परिसरात प्रतिक्रिया दिली की कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील 40 गावांसंदर्भात वक्तव्य केले असून महाराष्ट्रातील चाळीस गाव कर्नाटकामध्ये विलीन करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आज रोजी केली आहे. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की चाळीस गाव काय चार इंच सुद्धा महाराष्ट्राची जागा देणार नाही.असे खडे बोल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले आहेत.
महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नावरून अनेक वर्षापासून वाद सुरू असून आता कर्नाटकी मुख्यमंत्री यांनी यात उडी घेतली असून महाराष्ट्रातील चाळीस गावांवर त्यांनी दावा सांगितला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील चाळीस गावा वरती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा सांगितल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठी टीका कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवरती आज रोजी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावरती ही टीका केली असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की महाराष्ट्रातली चार इंच जागा सुद्धा कर्नाटक सरकारला मिळणार नाही.