इगतपुरी- इगतपुरी तालुक्यात काही दिवसांपासून डोंगरांना आग लावण्यात येत असल्यामुळे गावामध्ये बिबट्या व जंगली प्राण्यांचा वावर जास्त प्रमाणात वाढल्याने वनविभागाला जास्तच मशगत करावी लागत आहे.
तालुक्यातील अडसरे गावात रोज रात्री बिबट्याचा वावर होत असल्यामुळे वन विभागाने काळजी बाळगता ट्रॅप कॅमेरे, पिंजरे लावून ठेवले होते. त्यात आज दिनांक ६ एप्रिल रोजी पहाटे आज एका बिबट्याला जेलबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे.
अजूनही बिबट्या असल्याचा संशय असल्याने ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावून ठेवण्यात येणार आहे.यावेळी इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे , वन परिमंडळ अधिकारी इ. टी. भले , वनरक्षक संतोष बोडके,वनरक्षक एफ.जे. सय्यद ,वनरक्षक श्रीमती रेशमा पाठक , वनरक्षक एम.जे. पाडवी ,वनरक्षक श्रीमती बी.एस खाडे ,वनमजुर दशरथ निर्गुडे, भोरू धोंगडे , गोविंद बेडकुली , चालक मुजाहिद शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.