सातारा – साताऱ्यातील खंडोबाचा माळ येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार कसा घडला हे अद्यापही अस्पष्ट आहे.
सध्या सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करण्यात येत आहे.या प्रकरणी किस्मत भोसलेसह २ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रात्री २ च्या सुमारास घडली आहे.हा प्रकारामुळे सातारा शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.