अहमदनगर – कोरोना विषाणूने देशात हाहाकार माजवला आहेत .हजारोच्या पट्टीने लोक मृत्युमुखी पडत आहेत. मात्र अहमदनगरम शहरातील नालेगाव अमरधाममध्ये गुरुवारी मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला. एकाच दिवशी ४२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जागा अपुरी पडत असल्याने जिथे जागा मिळेल तिथे सरण रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ प्रशासनावर आली.
मागच्या वर्षी देखील नगरमध्ये कोरोनामुळे आशा परिस्थितीला सामोरे जावे लागले होते.कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या २३ जणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते व यावर्षी त्यापेक्षा भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.