सातारा । वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने फलटण येथे शनिवार दिनांक १ मे २०२१ सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिर होणार असल्याची महिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रविण पिसाळ यांनी दिली.
शुभारंभ हॉल मंगल कार्यालय विंचुर्णी रोड फलटण येथे हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. जिल्ह्यातील रुग्णालये रक्तपेढया मध्ये रक्तसाठा कमी पडत आहे. तरी सर्व जाती धर्मातील बांधवांनी पुढाकार घेऊन आलेल्या महामारी मध्ये रक्तसाठा कमी पडू नये म्हणुन रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा. तसेच जे बांधव कोरोना मधुन बरे झाले असतील त्यांनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना सारख्या महामारीच्या काळात सामजिक योगदानाच्या दृष्टीकोनातून वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी दत्ता जगदाळे, गजानन चव्हाण,बालाजी पवार,सुरज नलवडे, सागर धुमाळ, गणेश काळे,ऋषिकेश कदम व संपूर्ण सातारा टिम प्रयत्नशिल आहेत.