‘फँड्री’तला जब्या अर्थात सोमनाथ अवघडे पहिल्याच सिनेमात उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. सोमनाथ अवघडे याच्या ‘जब्या’च्या भूमिकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.त्यानंतर हा अभिनेता दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. पण आता तो पु्न्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘फ्री हिट दणका’या मराठी चित्रपटात सोमनाथ पुन्हा एकदा झळकणार आहे. या चित्रपटात तो हटके भूमिकेत असून त्याचा वेगळा लुक देखील चर्चेत आला आहे.
‘फँड्री’तील जब्याची भूमिका पाहून मिस्टर परफेक्शनिस्ट भारावला होता. आमिर खानने सोमनाथचं तोंड भरून कौतुक केलं होतं. ‘फँड्री’मध्ये जब्या अर्थात सोमनाथ, पिऱ्या म्हणजे सूरज पवार आणि शालू म्हणजे राजेश्वरी खरात या तिघांनी जबरदस्त अभिनय केला होता. ‘फँड्री’साठी सोमनाथ तयार नव्हता. त्याला या चित्रपटासाठी कसं तयार केलं याचे किस्से त्याने आणि नागराज मंजुळे यांनी अनेकदा सांगितले आहेत.