कोल्हापूर दि. १९- कोल्हापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी सर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम पार पडला. तेथील कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिलं बऱ्यापैकी जमाही केली आहेत. पण आजरा सहकारी साखर कारखान्याचा गेली दोन वर्षे हंगाम झालाच नाही. हा कारखाना सध्या बंद अवस्थेत आहे. अद्याप कारखाना सुरू होण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उसाचे बिल आता मिळेल याची शक्यताच नाही आहे. आमचे ऊस बिल न मिळाल्यास आजरा तालुक्यातील शेतकरी वर्गांने आता संचालकांच्या घराघरांवर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी संचालकांना शेतकरी बांधवानी दिलेला आहे.
गेली दोन वर्षे कारखाना बंद झाल्याने येथील कर्मचारी व शेतकरी अक्षरश: देशोधडीला लागले आहेत. पण या संचालकानाही यांचे काय देणेघेणे दिसत नाही. हे संचालक निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. आता शेतकरी खतासाठी घेतलेले कर्ज फेडताना नाकेनव झाले आहेत.ज्या चेअरमनच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला त्यांना आम्ही शेतकरी जाब विचारणार असल्याचे यावेळी शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले आहे.