टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मोयना विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरलेल्या अशोक डिंडावर मंगळवारी जिवघेणा हल्ला झाला. हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
West Bengal: Former cricketer and BJP candidate from Moyna, Ashok Dinda attacked by unidentified people in Moyna. Details awaited. pic.twitter.com/wxu6mT335v
— ANI (@ANI) March 30, 2021
अशोक डिंडाची गाडी मोयना बाजार परिसरात आली असता 50 हून अधिक लोकांनी त्यावर हल्ला चढवला. गाडीवर करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे गाडीच्या काचा फुटल्या. तसेच अशोक डिंडाला किरकोळ दुखापत झाली. या हल्ल्याची माहिती अशोक डिंडा याने स्वत: ट्वीट करून दिली. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी चार वाजता बीडीओ कार्यालयाजवळ माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप अशोक डिंडा याने केला. मात्र टीएमसीने हे आरोप फेटाळून लावले असून हा भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाली असून त्याला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याच्यासोबत सीआरपीएफचे जवान सुरक्षेसाठी कायम तैनात असणार आहेत.