प्रतिनिधी – तृप्ती गायकवाड
कोलकत्ता दि.९ – कोलकात्यातील बडा बाजार परिसरात इमारतीला भीषण आग लागली होती. सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली.
एएनआय ने दिलेल्या वृत्तानुसार, स्ट्रँड रोडवरील इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील लागलेल्या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
West Bengal: Fire breaks out on the 13th floor of a multi- storey building at Strand road in Kolkata. 8 fire tenders reach the spot. More details awaited pic.twitter.com/DLzrmBZDkF
— ANI (@ANI) March 8, 2021
आगीची घटना घडताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच या इमारतीत रेल्वेचे कार्यालय असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये या साठी तात्काळ आजुबाजुच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून लोकांना घटनास्थळाकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला.
दरम्यान ममता बॅनर्जी या घटनास्थळी दाखल झाल्या व बचावकार्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले.