मुंबई। शुक्रवारी लागलेल्या भांडुपच्या ड्रीम्स मॉल आणि सनराईज रुग्णालय अग्नि दुर्घटना प्रकरणात भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ड्रिम्स मॉलचे संचालक आणि सनराईज हॉस्पिटलच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राकेशकुमार वाधवान, निकीता त्रेहान, सारंग वाधवान, दिपक शिर्के या ड्रिम्ल मॉल्सच्या संचालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तसेच सनराईज हॉस्पिटलचे संचालक अमितसिंह त्रेहान, निकीता अमितसिंग आणि स्विटी जैन यांना आरोपी बनवण्यात आले आहे.
ड्रीम्स मॉल आणि सनराईज रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून यात दोषींवर कारवाई होईल असे सांगण्यात आले होते.
कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. या मॉलमध्ये ११०८ गाळे असून ४० टक्के गाळे सुरु आहेत. जानेवारी २०२१ पासून सनराईज हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून कार्यरत आहे. मॉल आणि हॉस्पिटलने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली नसल्याचे भांडूप पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे.