नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभरात कोरोना संसर्गाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज मोठया संख्याने बाधित रुग्ण आपल्या जिवाला मुकताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज सर्व बाजूंनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यातच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडत आजच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.
भारतात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशात सध्या आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने लोकांची मदत करायला हवी. मात्र, केंद्र सरकार हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असल्यांचे मत परकला प्रभाकर यांनी मांडले आहे.
पुढे बोलताना अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर म्हणाले की, ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात अतिशय विदरक परस्थिती निर्णाम झाली आहे. या भयावह संकटामुळे लोकांना नोकऱ्या गमावाव्या लागत आहेत. कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात जवळ असणारे पैसे खर्च केल्यामुळे साठवलेले पैसेही संपत आहेत. या आर्थिक नुकसानानंतर पुन्हा उभे राहणं कठीण जात आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1.80 लाख लोकांचा जीव गेलाय. मात्र, सरकार कोरोना रुग्णांचे खरे आकडे सांगत नाही.