पुणे – पुण्यातील वाघोली येथील कॉटमट इलेक्ट्रॉनिक प्रा. लिमिटेड या कंपनीच्या गोडाऊनला आज दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. गोडाऊनमध्ये कंट्रोल पॅनल बनवण्याचे काम केले जात असल्याने मोठ्या प्रमाणावर कच्चा मालाचे मटेरियल होते.
तसेच गोडाऊन बंद असल्याने आगीने वेग धरला व रौद्र रूप धारण केले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे.
वाघोली येथील पीएमआरडीएच्या अग्नीशमन दलाला यांची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. मात्र गोडाऊन बंद असल्याने त्यांना अनेक आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी एका बाजूने भिंत पाडून आत प्रवेश केला. त्यांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आली.तीन अग्निशमन वाहनांच्या मदतीने १५ जवानांच्या साह्याने ३ तास अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले.