वाढत्या महागाईमुळे व लॉकडाउनमुळे गेले कित्येक दिवस सर्वसामान्यांचे हाल होत असतानाच वीज नियामक आयोगानं मोठा दिलासा दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठीच्या वीज दर जाहीर केले असून या निर्णयानुसार महावितरणच्या घरगुती वीजबिलात १ टक्के कपात केली आहे.
त्यामुळे युनिटमागे ग्राहकांना ७.५८रुपये द्यावे लागणार आहे. अदाणी कंपनीची वीज घेणाऱ्या ग्राहकांना ०.३टक्के वाढ लागू केली असून, प्रत्येक युनिटसाठी ग्राहकांना ६.५३ रुपये मोजावे लागणार आहे. तर बेस्टच्या ग्राहकांना ०.१ टक्के वाढीनुसार युनिटमागे ६.४२रुपये द्यावे लागणार आहे. टाटा पॉवरच्या वीजदरात १ एप्रिलपासून ४.३ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. आयोगाने दरवाढीला मंजुरी दिली असून, ‘टाटा’च्या ग्राहकांना प्रति युनिट ५.२२ रुपयांची अधिकची झळ बसणार आहे.
या वीज नियामक आयोगांच्या निर्णयामुळे सर्वसान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.