प्रतिनिधी – तृप्ती गायकवाड
शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवणारे तसेच विचारांचे शस्त्र बनवून समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना छेद देणारे क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
स्त्रियांनी सुशिक्षित व्हावे तसेच त्यांनाही शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजाचा रोष पत्करून शिक्षणाचे पवित्र कार्य अखंड चालू ठेवले. त्यांच्या प्रेरणादायी आयुष्यावर आधारित महात्मा हा मराठी चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे.
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विध्वंस हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून त्यांनी आपल्या सोशल मीडियावर नुकताच टिझर पोस्ट केला आहे. महात्मा हा चित्रपट दोन भागांमध्ये असून पहिला भाग क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले
व दुसरा भाग क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे दोन भागांचे नाव आहे.
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जवाबदारी समीर विध्वंस यांची असून अनिष जोग आणि रणजित गुगळे हे निर्माते आहेत.
या चित्रपटाला अजय- अतुल यांचे संगीत असणार असून 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होताच काही वेळातच या टिझर ला तुफान प्रतिसाद मिळाला.
क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. सावित्रीबाईंच्या स्मृतीस वंदन करून सांगू पाहतोय..अन्यायाविरूद्धच्या अभूतपूर्व लढ्याची कथा!” असे कॅप्शन देत समीर विध्वंस यांनी इन्स्टाग्रामवरून आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.