राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. मात्र राज्यांना पुरवण्यात येणाऱ्या लसीसंदर्भात केंद्राकडून काही नियम आखण्यात आले आहे. यावरच आता काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी भाष्य केले आहे.
महाराष्ट्रासारख्या करोनाबाधीत राज्यांमध्ये तरी केंद्राने नियम शिथिल करून मागेल त्याला ‘कोरोना लस’ देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी प्रत्येक नागरिकाला लस देण्याची केलेली मागणी योग्य असल्याचं अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटलं. तास एच या संदर्भात त्यांनी ट्विट सुद्धा केले आहे.
या संदर्भात ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, महाराष्ट्रात राज्य शासनाच्या माध्यमातून व्यापक स्तरावर लसीकरण मोहिम सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दोन-तीन दिवस पुरेल इतक्याच लसींचा साठा शिल्लक असल्याचे दिसून येते. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला तातडीने अधिकाधिक लसींचा पुरवठा करण्याची गरज आहे” असे त्यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रात राज्य शासनाच्या माध्यमातून व्यापक स्तरावर लसीकरण मोहिम सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दोन-तीन दिवस पुरेल इतक्याच लसींचा साठा शिल्लक असल्याचे दिसून येते. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला तातडीने अधिकाधिक लसींचा पुरवठा करण्याची गरज आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) April 7, 2021