पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात गळती सुरु झालेली आहे. त्यात आता माजी आमदार आणि भाजपा नेते नितीन पाटील यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत काल शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
या घडामोडीनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलला खुप मोठा धक्का बसला आहे.
संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणुक होण्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, फलोत्पादन तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे, महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संभाजीनगर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगावकर, अॅड, देवयानी डोणगावकर यांची या वेळी उपस्थिती होती.
या शिवसेनेचा परिणाम आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना नक्कीच उपयोग करुन घेणार यात मात्र शंकाच नाही. तर नितीन पाटील यांच्या रुपाने शिवसेनेला सहकार क्षेत्रातील मोठा चेहरा मिळाला आहे. तर आता ते शिवसेनेच्या पक्ष शिस्तीशी कसे जुळवून घेतात का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.