उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव कोरोना लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करत सांगितले आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर अखिलेश यादव यांनी स्वत:चे विलगिकरण करून घेतलं आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हरिद्वारमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात अखिलेश यादव हे उपस्थित होते. व त्यांनी कुंभमेळ्यात ज्या महारांची भेट घेतली ते महाराज कोरोना पॉसिटीव्ह होते व आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवदेखील कोरोना पॉसिटीव्ह आले आहेत.
अभी-अभी मेरी कोरोना टेस्ट की रिपोर्ट पॉज़िटिव आई है। मैंने अपने आपको सबसे अलग कर लिया है व घर पर ही उपचार शुरू हो गया है।
पिछले कुछ दिनों में जो लोग मेरे संपर्क में आये हैं, उन सबसे विनम्र आग्रह है कि वो भी जाँच करा लें। उन सभी से कुछ दिनों तक आइसोलेशन में रहने की विनती भी है।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 14, 2021
‘आताच माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे आणि घरातच उपचार सुरू करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांना विनम्रतेने आग्रह करतो की चाचणी करून घ्या. तसेच काही दिवस विलगिकरण करून घेत स्वत: इतर कुणाच्या संपर्कात येऊ नका.’, असं ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे.