करोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात अनेक क्रिकेटपटू,अभिनेते, नेते हे करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणला करोनाची लागण झाली आहे. इरफानने स्वत: सोमवारी ट्विटरवरुन ही माहिती दिली. इरफानच्या अगोदर एस. बद्रीनाथ, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि युसूफ पठाण यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. हे सर्व खेळाडू छत्तीसगडच्या रायपूरमध्ये पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा विजेता संघ इंडिया लेजेंड्सचा भाग होते.
— Irfan Pathan (@IrfanPathan) March 29, 2021
इरफानने ट्वीट केले की, “कोणतीही लक्षणे नसताना मी करोना चाचणीत पॉझिटिव्ह आलो आहे. मी स्वत: ला घरीच आयसोलेट केले आहे. माझ्याशी संपर्क साधलेल्यांनी चाचणी करावी. मी सर्वांना विनंती करतो की मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. स्वत: ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.”असं ट्विट करत त्यांनी सर्व माहिती दिली आहे. व सर्वाना काळजी घेण्यास सांगितले आहे.