मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार असून सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशीचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत.
यावेळी न्यायालयाने १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे. न्यायालयाने परमबीर यांची याचिका निकाली काढताना त्यांनी आपल्या तक्रारी संबंधित यंत्रणेसमोर मांडाव्यात असं स्पष्ट केलं.
मात्र आता यावरून भाजप आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. ‘गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या’ अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.