नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. त्याच बरोबर कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र काही सूचना केल्या आहेत.
मनमोहन सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनावरील लसीची गती आणखी वाढवावी लागेल. कारण कोरोनावरील उपचारासाठी हे महत्त्वाचे आहे. किती लोकांचे लसीकरण झाले यापेक्षा लोकसंख्येच्या किती टक्के लसीकरण झाले आहे हे महत्त्वाचे आहे. अद्याप किती टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे तसेच किती टक्के बाकी आहेत हा आकडा महत्वाचा आहे.
आज ४५ वर्षांहून कमी वयाच्या लोकांनादेखील लसीकरण करण्यात यावे म्हणजे ज्यांचे वय ४५पेक्षा कमी आहे पण हे फ्रंटलाइन वर्कर्स व आरोग्य कर्मचारी आहेत, शिक्षक, बस, टॅक्सीचालक आहेत त्यांनासुद्धा प्राधान्याने लस दिली पाहिजे, असे मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे सुचवले आहे.
मनमोहन सिंग यांचा कोरोनावर उपाययोजना सुचवणारा पाच कलमी कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
१) पुढील सहा महिन्यांसाठी किती लसींची ऑर्डर दिली आहे हे जाहीर करावे.
२) राज्यांना अपेक्षित असलेला साठा कसा पुरवला जाईल याबाबत संकेत द्यावेत.
३) राज्यांना प्रंटलाइन वर्कर्सची श्रेणी ठरवण्यासाठी सूट द्यायला हवी.
४) लस निर्मात्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी सवलती द्या.
५)वापरासाठी परवानगी दिलेल्या कुठल्याही लसीच्या आयातीसाठी परवानगी द्यावी,