नवी मुंबई- पाठीमागच्या लॉकडाऊनमध्ये सलून व्यावसायिकांना खूप नुकसान सोसावे लागले आहे.आता ही राज्यसरकारने सर्वप्रथम सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव किराणा,भाजीमंडई,हॉटेल या ठिकाणावरून सुद्धा होत असतो.तरी सुद्धा फक्त आमच्यावरच सक्ती का?
हातावर पोट असणाऱ्या लोकांची संख्या आमच्याकडे जास्त आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वात उशिरा परवानगी आमच्याच व्यवसायाला देण्यात आली. त्यावेळी सुद्धा अत्यंत कडक नियम लावले होते ते अजून तसेच आहेत.
आता ही काही आणखी नियम लावून आमचा व्यवसाय चालू करणेस परवानगी द्यावी.आमच्या व्यवसायाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे उदाहरण दिसत नाही.तरी मायबाप शासनाने आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र् राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाभिक विकास फाऊंडेशनचे श्री. नरेश गायकर यांनी केले आहे.